‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार? – eNavakal
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र धक्कादायक म्हणजे या तापावर अद्याप कोणताही उपाय उपलब्ध नाही. या आजाराबाबत संशोधनासाठी शास्त्रज्ञांचा विशेष संघ तयार करण्यात आला आहे. परंतु अनेक प्रयत्न आणि संशोधनंतरही या तापावर उपाय शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळे  डॉक्टर सध्या या तापाच्या रुग्णांना अॅण्टीव्हायरल औषधे, अॅण्टीइंफ्लेमेटरी औषधे देतात आणि आरामाचा सल्ला देतात. शिवाय जेवणातली पथ्ये पाळण्यास सांगतात.

मुख्य म्हणजे या आजाराचं कारणही सापडलेलं नाही. परंतु शास्त्रज्ञांनी केलेल्या निरीक्षणानुसार मे महिन्यापासून या आजाराचे रुग्ण आढळले असून याच काळात लीची फळ पिकते आणि खाली पडते. लहान मुलं बागेत जाऊ ही फळं मोठ्या प्रमाणावर खातात. या फळामध्ये व्हायरस असू शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. मात्र अवघ्या ६ महिन्यांच्या आणि १ वर्षाच्या बालकांमध्ये हा आजार कसा आढळतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच हा आजार नव्वदच्या दशकात आला असून २०११ साली प्रथमच याचे रुग्ण आढळले, असे संशोधनात सामील असलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

चमकीची लक्षणे

अशक्तपणा, डोकेदुखी, सांधेदुखी, ताप, मळमळ, उलटी, मानसिक अस्थिरता, अंधुक दिसणे, केस गळणे, लकवा, इत्यादी.

काळजी कशी घ्याल?

नियमित रक्तचाचणी, नियमित तपासणी, डासांपासून संरक्षण, शारीरिक स्वच्छता पाळणे, संतुलित आहार घेणे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More