चपाती करपली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक – eNavakal
News गुन्हे देश

चपाती करपली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

लखनौ – सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धत रद्द केले आहे. असे असतानाही लखनौमध्ये स्वयंपाक करतेवेळी चपाती करपली म्हणून पतीने पत्नीला तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेश येथील खरेला पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना देण्यात आले आहेत.

पहरेथा गावातील 24 वर्षीय रजिया आणि निहाल यांचा 4 जुलै 2017 रोजी विवाह झाला होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून पतीकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत पत्नीने पोलीस तक्रार दाखल केली आहे. पतीने तलाक देण्याच्या 3 दिवसांपूर्वीच जळालेल्या सिगरेटने अंगावर चटके दिले. तर स्वयंपाक करताना चपाती करपली म्हणून मला तीनवेळा तलाक बोलून घटस्फोट दिला, असे रजियाने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत प्रथम स्थानिक पोलिसांकडे रजियाने तक्रार केली. मात्र, तेथील पोलीस अधिकाऱ्याने हाकलून दिले. त्यानंतर तिने जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कानावर आपली कैफियत मांडली.  यानंतर तिची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. दरम्यान, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धत रद्द केले असूनही हा गंभीर प्रकार घडला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More