‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर आज ‘चंपा’विषयी अजित पवार यांनी मोठा खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्यानेच चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असल्याचे मला सांगितले, असे अजित पवार म्हणाले. या मंत्र्याचे नाव मी निवडणुकीनंतर सांगेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, ‘मी एका कामासाठी भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही बोलत असताना त्या मंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा असे म्हणण्यात आले. मी निवडणुकीनंतर हे मंत्री कोण होते, त्यांचे नाव सांगेन. पण हा शब्द मी तयार केलेला नाही. चंद्रकांत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनीच तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली खोळंबल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा हडपसर येथील रोड शो आज सकाळी पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर पाऊस ओसरल्यावर त्यांनी रोड शो काढत शक्तीप्रदर्शन केले.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More