चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त – eNavakal
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत पाडण्यात आला. या तोडकामास टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. तरीदेखील तोडकाम थांबवण्यात आले नाही. एक जेसीबी, सहा ट्रक आणि 30 कामगारांनी तोडकाम पूर्ण केले.
जगनमोहन रेड्डी यांनी ’प्रजा वेदिका’ याच इमारतीत जिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊन इमारत पाडण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई केल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. दरम्यान रेड्डींच्या या निर्णयाला टीडीपीने राजकीय द्वेषातून केलेली कारवाई म्हटले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी प्रजा वेदिका हा बंगला विरोधी पक्षनेत्याचा बंगला म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी मुख्यमंत्री रेड्डी यांनी फेटाळली. आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटीने 5 कोटी रुपये खर्च करून हा बंगला बांधला होता. चंद्राबाबू नायडू या बंगल्याचा उपयोग पक्षाच्या बैठकांसाठी करत होते, असा आरोप होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More