चंद्राबाबूंच्या भेटी सुरूच! पवार, राहुलशी पुन्हा चर्चा – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

चंद्राबाबूंच्या भेटी सुरूच! पवार, राहुलशी पुन्हा चर्चा

नवी दिल्ली- या सतराव्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला अथवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार नाही याची पूर्वकल्पना देशातील राजकीय धुरंधरांना आली आहे. या धुरंधरांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून कालपासून ह्यांनी सोनिया, राहुल गांधी, शरद पवार, केजरीवाल यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. आज त्यांनी पुन्हा शरद पवार व राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली.
चंद्राबाबू नायडू यांच्यासह सपा, बसपा, काँग्रेस, भाकप, आप, माकप, राजद, लोक दल, तृणमूल असे 24 पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधात मोर्चेबांधणी करीत आहेत. चंद्राबाबू नायडू सर्व पक्षांशी बोलत आहेत. शुक्रवारी त्यांनी आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. शनिवारी त्यांनी राहुूल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, मायावती व अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. या नेत्यांशी केलेल्या चर्चेनंतर या चर्चेच्या फलिताची माहिती देण्यासाठी आज रविवारी चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा राहुल गांधी व शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीबाबत बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, आजच्या चर्चेत आम्ही आपापल्या राज्यांच्या निकालांचा आढावा घेतला व प्रत्येक राज्यात विरोधी पक्षांना किती जागा मिळतील याचा अंदाज बांधला. शरद पवार यांच्यासहित सर्वच पक्षांना कळून चुकले आहे की, देशात मोदीविरोधात सुप्त लाट आहे. म्हणूनच चंद्राबाबू यांनी भाकपचे डॉ.राजा, माकपचे सीताराम येच्युरी, लोकतांत्रिक दलाचे नेते शरद यादव यांची भेट घेतली व ममतांशी फोनवर चर्चा केली. सर्व विरोधक एक झाले तर समर्थ पर्याय दिला जाऊ शकतो.

भाजपा निकडीच्या वेळी
पटनायकांची मदत मागेल
भाजपाला सध्याच्या मित्र प्रक्षांसहित सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तर भाजपा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक व त्याच्या बिजू जनता दलाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करेल. कारण नवीन पटनायक हे विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील झालेले नाहीत. तसेच टीआरएसच्या के.चंद्रशेखर राव यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्नही केला जाईल. ओडिशात लोकसभेच्या 21 व तेलंगणात 18 जागा आहेत. त्यातील सिंहाचा वाटा हा नवीन पटनायक व के.चंद्रशेखर राव यांचा असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More