वॉशिंग्टन – अमेरिका अंतराळ एजन्सीने चंद्रावर जाणार्या पहिल्या महिलेचा विशेष पोषाख तयार केला आहे. त्याचे आज अनावरण करण्यात आले. 2024 च्या चंद्र दक्षिण ध्रुव मिशनसाठी नासा पहिल्यांदाच या पोशाखाचा वापर करणार आहे, अशी माहिती नासाचे प्रशासन जीम ब्रीडेन्स्टाईन यांनी दिली. लाला, सफेद आणि निळ्या रंगाचा हा पोषाख अत्याधुनिक तापमानापासून बचाव करेल, असे नासाचे म्हणणे आहे.
