चंद्रपुरात नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यालाच पिंजर्‍यात बसवले – eNavakal
News महाराष्ट्र

चंद्रपुरात नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यालाच पिंजर्‍यात बसवले

चंद्रपूर – नरभक्षक वाघ किंवा बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते नाहीतर बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी 1 वाघ या प्रयोगाला जुमानत नसल्याने वनविभागाने चक्क बकरीऐवजी आपल्या विभागातील कर्मचार्‍यांनाच पिंजर्‍यात बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंजर्‍यात कोण कितीवेळ बसणार याचे वेळापत्रक वनविभागाने तयार केले आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 8 असे तब्बल 14 तास त्यांना पिंजर्‍यात बसवले जात आहे. राजुरा वनक्षेत्रात 11 ऑक्टोबरपासून हा प्रयोग राबवला जात आहे. तरीही वाघ पिंजर्‍यात बसलेल्या वनपाल, वनरक्षक वा वनमजुराजवळ फिरकला नसल्याचे समजते. राजुरा वनक्षेत्रासह परिसरातील वनक्षेत्रात आर टी 1 वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने दहा जणांचा बळी घेतला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करा वा ठार मारा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या मागण्यांसाठी दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले होते. त्यामुळे हतबल झालेल्या वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यांनाच पिंजर्‍यात बसवावे लागत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चंद्रपुरात नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यालाच पिंजर्‍यात बसवले

चंद्रपूर – नरभक्षक वाघ किंवा बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते नाहीतर बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी...
Read More
post-image
News देश

श्रीकृष्ण जन्मभूमी मालकी हक्क

मथुरा (उत्तर प्रदेश)- मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीच्या हक्काची याचिका मथुरेतील जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. यापूर्वी ही याचिका मथुरेतील सिव्हिल कोर्टाने नाकारली होती. या सिव्हिल...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बस दुभाजकाला धडकली

मुंबई- विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर 27 नंबरची बेस्ट मिनी बस दुभाजकाला धडकल्याने 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घडला आज शनिवारी घडली..ही बस भांडूप येथून वरळीकडे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More
post-image
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...
Read More