चंद्रकांत पाटलांनी येत्या लोकसभेत विरोधात उभे रहावे- राजू शेट्टी – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

चंद्रकांत पाटलांनी येत्या लोकसभेत विरोधात उभे रहावे- राजू शेट्टी

कोल्हापूर- महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांना निशाणा केला होता. त्यालाच प्रतिउत्तर देत खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत दादांना येत्या लोकसभेचे आव्हान दिले आहे. येत्या लोकसभेला माझ्या विरुद्ध उभे रहावे, मग पहावे कि माझ्या पाठीमागे किती शेतकरी आहेत, आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही बेजबाबदार आहात, म्हणून आम्हाला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला, असा टोला राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

पत्रकारांशी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले कि, राजकिय हेतुसाठी शेतकऱ्यांचा उपयोग केला जातो, त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती उतरण्याची गरज पडली आहे. एकेकाळी मी ज्यांना विष्णू मानत होतो. तेच आता मला खोटे ठरवत आहेत. शेतकरी कुणाच्या पाठीमागे आहेत, याची काळजी चंद्रकांत पाटील यांनी करू नये, त्यांना शेतकरी कोणाच्या मागे आहेत हे जर पहायचे असेल, तर येत्या लोकसभेला विरुध्द उभे रहावे आणि मग पहावे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

ऊस दर संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जे दर ठरवले होते, तेच आम्ही मागतोय, मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी करायची भाषा केली होती. त्याबद्दल काय झाले, याचे उत्तर चंद्रकांत पाटलांनी द्यावे. त्याचबरोबर मागील वर्षी पाटलांनी शेतकरी आणि कारखानदार यांच्यात मध्यस्थी केली होती? त्यावेळेला त्यांनी काही आश्वासने दिली होती, ती त्यांनी अजुन पुर्ण केलीच नाहीत. चंद्रकांत दादा पाटील यांनी आतातरी ती आश्वासने पुर्ण करावीत, असे आव्हान राजू शेट्टी यांनी चंद्रकात दादा पाटील यांना पत्रकारांच्या माध्यामातून केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More