चंदा कोचर फरार झाल्या? सीबीआयची लूकआऊट नोटीस – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

चंदा कोचर फरार झाल्या? सीबीआयची लूकआऊट नोटीस

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती, वेणूगोपाल धूत व इतर दोघांच्या विरोधात सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्या सर्वांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही त्यांनी सुरक्षा एजन्सींची नजर चुकवून भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास विमानतळावरील इमिग्रेशन विभागाने सीबीआयला तत्काळ कळवावे असे या नोटिसीत
म्हटले आहे.

चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला 2009 ते 2011 या काळात वेगवेगळी कारणे दाखवून 1,575 कोटींचे कर्ज दिले. कर्ज मिळताच ते परत करण्याची वेळ येताच व्हिडीओकॉन उद्योग समूहाने 30 जून 2017 ला कंपनीचे दिवाळे वाजल्याचे जाहीर केले. सीबीआने याप्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More