चंदा कोचर आणि २० रुपयांच्या कंपन्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

चंदा कोचर आणि २० रुपयांच्या कंपन्या

मुंबई – आयसीआयसीआय बँकेत स्वतःच्या फायद्यासाठी व्हिडिओकॉन व इतर कंपन्यांना कर्ज देणार्‍या चंदा कोचर व त्यांचे पती यांची ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नवीन कंपन्या कशा स्थापन झाल्या. कंपन्यांची मालकी कशी फिरवली गेली याची माहिती उघड होत आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या अनेक कंपन्या आहेत. यातील सुप्रीम एनर्जी, न्यूपॉवर विंड फार्म, क्रेडेन्शियल सिक्युरिटी, क्रेडेेन्शियल कॅपिटल सर्व्हिस, डेसी इन्व्हेस्ट व इतर काही कंपन्यांवर शरद म्हात्रे हे संचालक बोर्डावर आहेत. चंदा कोचर यांचा भाऊ महेश आडवाणींची पत्नी नीलम यांनी 2008 साली मनदीप सॉफ्टवेअर ही कंपनी स्थापन केली तिथेही शरद म्हात्रे संचालक आहेत.
1997 साली एलिगंट इन्व्हेस्टेड कंपनी स्थापन केली. सविता नाईक आणि सिद्धार्थ जाधव त्याचे संचालक होते. कंपनीचे भागभांडवल केवळ वीस रुपये होते. त्याच वर्षी आनंद दालवानी आणि शरद म्हात्रे यांनी ही कंपनी विकत घेतली. तेव्हाच क्रेडेन्शियल फायनान्स या दीपक कोचर यांच्या कंपनीला कर्ज देणार्‍यांनी कंंपनी बंद करण्याबाबत उच्च न्यायालयात अर्ज केला. कंपनी कर्जफेड करीत नसल्याने प्रशासक नेमावा अशी मागणी केली. तेव्हा अचानक 20 रुपये भांडवल असलेल्या एलिगंट कंपनीने 2.75 कोटी भरून क्रेडेेन्शियल कंपनीची मालमत्ता विकत घेण्यासाठी अर्ज केला. त्यांनी एचडीएफसी बँकेची कागदपत्रे दाखवली आणि त्यामुळे कोर्टाने मंजुरी दिली. मेकर चेम्बरमधील कंपनीचे कार्यालयही त्यांनी 60 लाख रुपये देऊन घेतले. वीस रुपये भागभांडवल असलेल्या आनंद दालवानी आणि शरद म्हात्रे यांच्या कंपनीकडे दीपक कोचरच्या क्रेडेन्शियल कंपनीची मालमत्ता घेण्याइतके 3 कोटी रुपये कुठून आले ते अद्याप समजलेले नाही. हा व्यवहार झाल्यावर क्‍वालिटी अ‍ॅडव्हायझर ट्रस्टेने ही कंपनी विकत घेतली.
1996 साली संतोष जबरे आणि चंद्रप्रकाश सोनी यांनी 20 रुपये भागभांडवलावर डेझी फिनव्हेस्ट ही कंपनी स्थापन केली. 2004 साली जयपाल भाटिया यांनी ही कंपनी विकत घेऊन कंपनीचे भांडवल एक लाख रुपयांपर्यंत नेले. 2006 साली चंदा कोचरचा भाऊ महेश आडवाणीची पत्नी नीलमच्या पॅसिफिक सर्व्हिसेसने ही कंपनी विकत घेतली त्यावेळी दीपक म्हात्रे डेझी फिनव्हेस्ट कंपनीत संचालक होते. 2004 ते 2010 दरम्यान कंपनीने विनातारण 6 कोटीच्यावर कर्ज घेतले होते. 2017 साली ही कंपनी दीपक कोचर यांच्या क्रेडेन्शियल कंपनीत विलीन करण्यात आली. कर्जाऊ घेतलेल्या रक्कमेचा माग इथे संपला. अशा रितीने सातत्याने कंपन्या स्थापन करून पैसे शिताफीने फिरविण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More