घातक शस्त्रांसह दोघांना अटक – eNavakal
News गुन्हे

घातक शस्त्रांसह दोघांना अटक

मुंबई- घातक शस्त्रांसह दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली. शिवा गोपाळ नायडू आणि सलमान शमशुद्दीन खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर येथील घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील बसस्टॉपजवळ काही तरुण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील मनिष श्रीधनकर, आनंद बागडे, विशाल शिंदे, शशिकांत मोरे, ताजणे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून सलमान खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडले. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अशाच दुसर्‍या कारवाईत पोलिसांनी शिवा नायडू याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More