घाटकोपरमध्ये भरदिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

घाटकोपरमध्ये भरदिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या

मुंबई – मुंबईच्या घाटकोपरमध्ये आज सकाळी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दिवसाढवळ्या भररस्त्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली. घाटकोपर स्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या सर्वोदय रुग्णालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नवा बबलू दुबे आहे. यावेळी रिक्षेतून आलेल्या तीन जणांनी बबलू दुबे यांच्यावर गोळीबार केला. या तिघांनीही तोंडावर मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. गोळीबार करून हे तिघेही फरार झाले. यानंतर बबलू दुबे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More