घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; पायलटसह चौघांचा मृत्यू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या मुंबई

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; पायलटसह चौघांचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना घडली आहे. घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेनजवळ विमान कोसळले आहे. या अपघातात एका महिला पायलटसह विमानातील अन्य चौघांचा मृत्यू झाला असल्याचे राजावाडी रुग्णालयाने सांगितले आहे. या महिला पायलटचे नाव मारिया कुबेर असे असून त्या मुंबईच्या रहिवासी होत्या. तर त्यांच्यासह को-पायलट प्रदीप राजपूत आणि तंत्रज्ञ सुरभी आणि तंत्रज्ञ मनीष पांडे यांचा मृत्यू झाला आहे तसेच पादचारी गोविंद पंडित यांचाही मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेश व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी ९० विमान असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र उत्तरप्रदेश सरकारने हे विमान आपले नसल्याचे सांगितले आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाचा यापूर्वीही अपघात झाला आहे. तरी देखील हे विमान मुंबई एविएशनला विकण्यात आले आहे. सध्या विमानाचे ब्लॅक बॉक्स मिळाले असून या बॉक्समुळे अपघाताचं कारण शोधणंं शक्य होईल.

घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात मोठा स्फोट झाला. यूपी सरकारने विकत घेतलेले हे विमान होते. जुहू हॅलिपॅडवरून टेस्टिंगसाठी विमानाचे उड्डाण झाले होते. या दुर्घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाने परिसरात आगीचे मोठे लोळ पसरले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुपारी जेवणाच्या वेळेत अपघात झाल्यामुळे जास्त प्रमाणात जीवितहानी झाली नाही. सव्वा एक ते दीडच्या दरम्यान ३० ते ४० बांधकाम कामगार जेवायला गेले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस पोहचले असून अग्निशमन दलाच्य़ा सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न दलाकडून सुरु आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More