घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या – eNavakal
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल या प्रसिद्ध खासगी क्लासचे मालक मयांक मणदोत (२७) यांची त्यांच्याच कर्मचाऱ्याने हत्या केली. गणेश पवार (२५) या कर्मचाऱ्याने पैशाचा वाद आणि कामावरून काढल्याच्या रागातून मयांक यांची हत्या केली.

मयांक ट्युटोरियलचे मालक असलेले मयांक मणदोत हे विज्ञान विषयाचे शिक्षक होते, अल्पावधीत त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी त्यांच्या क्लासच्या शाखा उघडल्या होत्या. घाटकोपर पूर्व येथे ते विज्ञान विषय शिकविण्यास येत असत. चार महिन्यापूर्वी त्यांच्या क्लासमध्ये गणेश पवार हा रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लागला होता. काही कारणास्तव मयांक यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. रविवारी मयांक वर्गात शिकवत असताना गणेश त्याठिकाणी आला व दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भर वर्गात गणेशने धारधार शास्त्राने मयांक यांच्यावर वार केले आणि स्वत:वरदेखील वार करून घेतले. हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत त्वरित क्लासचे शटर लावून घेतले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि मयंक यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More