घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं? – eNavakal
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा येतो, चिडचिड होते. रोजची दगदग नाही, धावपळ नाही…सगळं काही निवांत. अहो मग बरं आहे ना. या निवांत वेळेचा किती सदुपयोग करता येईल याचा विचार केलाय का कधी, नाही ना? मग नक्की करा. घरातलया घरात राहून चिडचिड होऊ नये यासाठी काय काय करावे हे आज जाणून घेऊया.

घरातील वातावरण खेळीमेळीचे असावे

सर्वजण घरात असल्यामुळे मतभेद आणि कलह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे मतभेद होतील इतक्या टोकाला गोष्टी नेऊ नका. त्यासाठी घरातील वातावरण कायम खेळीमेळीचे असावे. वातावरण खेळीमेळीचे ठेवण्यासाठी कुंटुंबासोबत एकत्र वेळ घालवा. एकत्र बसून नाश्ता, जेवण करा. एकत्र मनोरंजनाचे कार्यक्रम पाहा, घरातील कामे वाटून घ्या, एकमेकांची काळजी घ्या.

छंद जोपासा

रोजगाच्या दगदगीतून आता तुम्हाला निवांत वेळ मिळाला आहे. त्यामुळे हा वेळ स्वतःला द्या. भूतकाळात मागे पडलेल्या तुमच्या आवडीच्या गोष्टींचा मागोवा घ्या. असे अनेक छंद असतील जे जपण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळच मिळाला नसेल. ते आता जपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तुम्ही प्रसन्न राहाल.

नियमित व्यायाम, योगासने करा

या काळात जिम किंवा योगा आणि डान्स क्लाससाठी तुम्हाला घराबाहेर जाणे शक्य नाही. मात्र त्यामुळे व्यायाम करणे टाळू नका. घरात राहून घरच्या घरी चालणे, योगासने, प्राणाायाम अथवा मेडिटेशन तुम्ही नक्कीच करू शकता. ज्यामुळे खुल्या हवेत न जाता घरातदेखील तुम्हाला प्रसन्न वाटेल.

नातेवाईक-मित्रमैत्रिणींसोबत सोशल मीडियावरून संपर्कात राहा

घरात राहिल्यामुळे एकटेपणा वाटत असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या संपर्कात राहा. त्यांना फोन करा, व्हिडीओ कॉल करा, त्यामुळे तुम्हाला एकटं वाटणार नाही. शिवाय लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर नवीन नवीन ट्रेंड येत आहेत. त्यांची मजा घ्या. जसे की Fishpond. म्हणजे जुने फोटो अपलोड करून त्यावर उखाणे आणि कविता रचणे.

सोशल मीडियावरून नवीन रेसिपी शिका

लॉकडाऊन जरी असलं तरी जीवनावश्यक गोष्टींचा पूरवठा नक्कीच सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला आवडणारे खाद्यपदार्थ घरीच बनवा आणि कुटुंबासोबत मिळून त्याचा आस्वाद घ्या. परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला असेल तर सोशल मीडियावरून नवीन रेसिपी शिका आणि लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा कोरोनाचं संकट नष्ट झाल्यानंतर या रेसिपी बनवून त्यांचा आस्वाद घ्या.

निवांत झोपा

निरोगी राहण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ तास झोपेची नितांत गरज असते. मात्र नेहमी दगदगीच्या जीवनशैलीमुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. कामानिमित्त सकाळी लवकर उठण्यामुळे आणि रात्री उशीरा झोपण्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही. मात्र आता काही दिवस तुम्हाला कुठेच जाण्यासाठी धावपळ करायची नाही आहे. तेव्हा दररोज पुरेशी झोप घ्या ज्यामुळे तुमचे मन शांत आणि निवांत राहण्यास मदत होईल. शिवाय यामुळे तुमची घरात राहण्यामुळे होणारी सततची चिडचिडदेखील कमी होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More