घनकचरा सेवा सिडकोकडून गुरूवारपासून बंद करण्याचा निर्णय – eNavakal
News मुंबई

घनकचरा सेवा सिडकोकडून गुरूवारपासून बंद करण्याचा निर्णय

पनवेल-  सिडकोने १५ मार्चनंतर महापालिका हद्दीतील कचरा उचलणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे कचरा उचलणे बंद करण्याचे आदेशही त्या-त्या विभागातील ठेकेदाराना सिडकोकडून देण्यात आले आहेत.  पालिका हद्दीतील सिडको वसाहतीतील कचरा उचलण्यास टाळाटाळ करणा-या पनवेल मनपाने अर्थिक दुर्बलता दाखवत सातत्याने कचरा हस्तांतरास नकार दिला होता. सिडको 15 मार्च रोजी ही नागरी सेवा पालिकेला हस्तांतरित करणार आहे.  मात्र आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ न देता 15 मार्चच्या मध्य रात्रीपासून ही सेवा बंद करण्याचा ठाम निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न चिघलण्याची शक्यता आहे

प्रत्येक आस्थापनाला डोकेदुखी ठरणारा घनकचरा व्यवस्थापन पनवेल महानगरपालिकेने आपल्याकडे घ्यावी म्हणून सिडकोने महापालिका स्थापन झाल्यापासून तगादा लावला आहे.  आतापर्यत पाच ते सहा वेळा पत्रव्यवहार केला असून पालिका आयुक्त यानी निधीची कमतरता असल्याने व पनवेलकरांच्या डोक्यावर अर्थिक बोजा पडू नये म्हणून घनकचरा सेवा हस्तांतरास नकार दिला होता.  पनवेल महापालिकडे योग्य साधनसामुग्री व मणुष्यबल संख्या कमी असल्याने दोन वेळा मुदत वाढ घेतली होती यात निधी खर्च होईल अशी महत्वाची भुमिका घेत घन कचरा व्यवस्थापन टाळले होते. मागच्या झालेल्या पत्रव्यवहारात तसेच बैठकीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊन जाऊ दे, त्यानंतर ही सेवा हस्तांतरित करून घेऊ असे पालिकेने जानेवारीत स्पष्ट केले होते मात्र, नुकतेच हे सर्वेक्षण पार पडले आहे. तसेच 15 मार्चची डेडलाईन ही दोन दिवसांवर आली असल्याने  घनकचरा व्यवस्थापन ही सेवा पनवेल महापालिकेने हस्तांतरित करून घेण्यासाठी सिडको आग्रही झाली आहे .

पनवेल पालिकेच्या उत्पन्नाचे ठोस स्तोत अद्याप हवे तसे तयार झालेले नाहीत अंदाज पत्रकही अवघ्या साडे पाचशे कोटीच्या घरात आहे त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नाही. तसेच ही सेवा घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तसेच यंत्र सामुग्रीचा अभाव पालिकेकडे आहे  त्यामुळे यासाठी काही कालावधी मिळावा अशी मागणी पालिकेने केली होती.  त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत मागितलेली मुदत संपत आली असून सिडकोने कचरा उचलणा-या ठेकेदारास कचरा न उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सेवेबाबत पनवेल मनपा काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत आयुक्त, उपायुक्त यांच्यासी संपर्क केला असता होवू शकला नाही, पण पालिकेने घनकचरा व्यवस्थापन हस्तांकरास होकार दिला असल्याचे समजते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More