घटस्फोटीत व्यभिचारी महिलेला पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

घटस्फोटीत व्यभिचारी महिलेला पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

मुंबई – विवाहबाह्य संबंधाच्याआधारे घटस्फोट झाला असेल तर व्यभिचारी महिलेला पोटगी (देखभाल खर्च) दिला जाऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. विवाहबाह्य संबंधावर घटस्फोट दिला गेला असल्याने पोटगी रद्द करण्याचा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी हा निर्वाळा देताना महिलेचे अपील फेटाळून लावले.सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील मोही गावातील विलास आणि सुुशिला (दोन्ही नावे बदललेली आहेत). यांचा 1980 मध्ये विवाह झाला.
तीन अपत्येही झाली. मिलिटरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर विलासला पाशिक येथे इंडीया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी मिळल्यानंतर पतीला घेऊन तेथे आली. विलास दिवसा घराबाहेर असल्याने त्यांच्याच घरी रहाणार्‍या वासुशी सुशिलाचे सुत जुळले. त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. ही बाब समजल्यानंतर विलासने वासुला घराबाहेर काढले. वासुचा विरह सहन न झाल्याने सुशिलाही 93 मध्ये वासुच्या घरी पळून आली. त्यानंतर विलासने घटस्फोटासाठी अर्ज केला. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 27 एप्रिल 2000 मध्ये सांगली कुटुंब न्यायालयाने या दोघांचा घटस्फोट मंजूर करताना सुशिला आणि तिच्या मुलीला अनुक्रमे 150 आणि 125 रुपये पोटगी मंजूर केली. त्या विरोधातील विलासचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More