‘ग्रेट वाॅल ऑफ चायना’ कुठे आहे माहित नाही? – eNavakal
विदेश

‘ग्रेट वाॅल ऑफ चायना’ कुठे आहे माहित नाही?

अमेरिका – आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे कमविता येणारा कार्यक्रम म्हणजे  कौन बनेगा करोडपती. या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने यात अधिकच रस येतो. हा कार्यक्रम मूळ अमेरिकेतील प्रसिद्ध कार्यक्रम ‘हु वॉंंट्स टू बी अ मिलेनियर’ यावरून घेतला आहे. याच्या टर्किश व्हर्जनमध्ये कालच्या भागात एक वेगळीच गंमत झाली. ग्रेट वाॅल ऑफ चायना कुठे स्थित आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एका स्पर्धकाने चक्क दोन लाईफलाईन चा वापर केला. एहान असे त्या स्पर्धक मुलीचे नाव आहे.

प्रश्नातच उत्तर असताना देखील एहानला २ लाईफलाईन घ्याव्या लागल्या. सर्वात आधी तिने ऑडियन्स पोल घेतले. ५१ टक्के लोकांनी याचे उत्तर चायना असे दिले. अर्धेच लोक चायना म्हणत असल्याने तिने फोन अ फ्रेंड ही लाईफलाईन वापरली. यावर चायना हेच उत्तर मिळाल्यावर तिने चायना उत्तर निश्चित केले. हा प्रश्न ३००० टर्किश लीरस म्हणजेच ३८००० हजार रुपयांसाठी होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More