ग्रामसेवकांनी मुख्यालयातच थांबावे, अन्यथा होणार कारवाई – eNavakal
महाराष्ट्र

ग्रामसेवकांनी मुख्यालयातच थांबावे, अन्यथा होणार कारवाई

लातूर – जवळपास प्रत्येक गावात शहरातून आलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. परंतु, अद्यापही आवश्यक काळजी घेतली जात नाही. ग्रामसेवक गावात राहत नाहीत त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामसेवकांनी आपले मुख्यालय सोडू नये अशी आग्रही भूमिका लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी घेतली होती. त्यानुसार आज मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांनी ग्रामसेवकांनी नवीन नियमावली प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना पाठवली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

जगभरात कोरोनाचा धूमाकूळ आहे. देशात व राज्यात योग्य काळजी घेतली जात आहे. भीतीने शहरातील नागरिकांनी आपापल्या मुळ गावी धाव घेतली आहे. अशात, प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामीण भागातील जनता अजूनही नियम पाळत नसल्याचे दिसून येत होते. आता गावातील परिस्थितीचे गांभिर्य ओळखून जिल्हा परिषद लातूरने ग्रामसेवकांना मुख्यालय सोडू नये असा आदेश दिला आहे. तर, आदेश न पाळणाऱ्या ग्रामसेवकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा ग्रामपंचायतीने केंद्रीय वित्त आयोगातून कराव्यात अशा मार्गदर्शक सुचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानूसार गावात फवारणी, स्वच्छता, जनजागृती, उपाय आदी कामे करण्यास सांगण्यात आले आहे.

सर्व सामान्यांना आरबीआयचा दिलासा! व्याज दरात कपात, कर्जाचे हप्ते ३ महिने स्थगित

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More