ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना न्यायालयाची पुन्हा चपराक – eNavakal
महाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना न्यायालयाची पुन्हा चपराक

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ग्रामविकास खात्याच्या 2515 योजनेचा निधी बांधकाम खात्याला वर्ग करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा चपराक दिली आहे. ग्रामविकास विभागाच्या 2515 योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मुलभुत विकास कामे करण्यासाठी निधी दिला जातो. राज्यातील ग्रामपंचायती या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येत असल्याने ही कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. मात्र केवळ राजकीय हेतूने विरोधकांच्या ग्रामपंचायतींना निधी जाऊ नये यासाठी मागील काही काळात ग्रामविकास विभागाकडून सातत्याने विरोधकांच्या ताब्यातील ग्रामपंचायतींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत करुन घेतली जात आहेत.

परळी विधानसभा मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायती विधान परिषद, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून वारंवार राजकीय विरोधापोटी ग्रामपंचायतीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला जात आहे. यापुर्वीही परळी विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीने करावयाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने चुकीचे ठरविल्याने हा शासन आदेश रद्द करण्याची नामुष्की ग्रामविकास विभागावर आली होती. असे असताना पुन्हा ग्रामविकास खात्याने असाच निर्णय घेतल्याने न्यायालयाने त्यालाही स्थगिती दिली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More
post-image
विदेश

अमेरिकेने डब्ल्यूएचओ सोडले! संघटनेवर चीनच्या वर्चस्वाचा आरोप

वॉशिंग्टन – कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असलेल्या अमेरिकेने या संघटनेचा निधी बंद केल्यानंतर आता या संघटनेतून बाहेर पडल्याचा निर्णयच जाहीर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर! लवकरच घरी परतणार!

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला पुन्हा एकदा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला मंगळवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये २४ तासांत सेनेच्या २ नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही आता त्याचे बळी ठरत आहेत. त्यात गेल्या २४ तासांत...
Read More
post-image
देश महाराष्ट्र मुंबई

Tiktok Pro फेक लिंकपासून सावधान

नवी दिल्ली – भारतात टिक टॉकवर बंदी घातली आहे. मात्र यामुळे अनेक टिक टॉक स्टार्स आणि या अ‍ॅपचे चाहते नाराज झाले आहेत. याचाच फायदा...
Read More