गोव्यात सलग दुसऱ्या दिवशीही टुरिस्ट टॅक्सींचा संप सुरु; पर्यटकांची परवड – eNavakal
देश वाहतूक

गोव्यात सलग दुसऱ्या दिवशीही टुरिस्ट टॅक्सींचा संप सुरु; पर्यटकांची परवड

पणजी – गोव्यात सलग दुसऱ्या दिवशीही पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांचा संप सुरूच असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. टुरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने आजही (शनिवार) टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मीटरला विरोध करीत गोव्यातील टॅक्सी मालकांनी बंद पुकारला आहे.

पोलिस, वाहतूक विभागाकडून केली जाणारी पिळवणूक, टॅक्सीचालकांना वेग नियंत्रणासाठी ‘स्पीड गव्हर्नन्स’ बसवण्यासाठी केली जाणारी सक्ती यांसारख्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीचालक संपावर गेले आहेत. सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणाऱ्या अवघ्या काही निवडक टॅक्सी वगळता सुमारे ९५ टक्के टॅक्सी काल बंद होत्या. कालपासून (शुक्रवार) पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. सुमारे २0 हजार टुरिस्ट टॅक्सी बंद आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचं टॅक्सीमालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शुक्रवारचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे टॅक्सी मालकांचा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More
post-image
महाराष्ट्र

हवेली तालुक्यात अशीही अफवा, सिहगडच्या जंगलात कोरोना रुग्ण

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यात काही गावांमध्ये अशी अफवा पसरली की त्यामुळे ही गावे रात्रभर जागी राहिली. पुण्यातील रुग्णालयातून पळालेले ४-५ कोरोनाबाधित रुग्ण सिहगडच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मृतांचे आकडे कमी करण्यासाठी सरकारने नेमली उच्चस्तरिय समिती

मुंबई – लॉकडाऊन असूनही मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे एकीकडे नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. हे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्ण शिथिल होणार नाही

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊन संपायला ७ दिवसांचा कालावधी...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनचा फज्जा, चौपाटीवर नागरिकांची गर्दी

भाईंदर – ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहतील, गर्दी करू नका’, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला...
Read More