गोवर रूबेला लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांना त्रास – eNavakal
महाराष्ट्र

गोवर रूबेला लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांना त्रास

नवी मुंबई – राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाने शालेय स्तरावर गोवर व रुबेला लस टोचण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र वाशी येथील एका खासगी शाळेत अनेक विद्यार्थी या लसीकरण मोहिमेत भोवळ येवून पडल्याने तसेच उलट्या झाल्याने काही काळ वातावरण भयभीत झाले. मनपा आरोग्य विभागाने याबाबत तातडीने पाहणी करून याबाबत सुरक्षेच्या सूचना दिल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेत ५० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या लस देण्यात आल्या आहेत. सुमारे चार लाख मुलांना लस देण्याचं लक्ष असल्याने शालेय स्तरावर ही मोहीम अतिशय गांभीर्याने राबवली जात आहे. मात्र वाशी येथील काही विद्यार्थ्यांना मळ मळ उलट्या होण्याचे प्रकार घडल्यावर आरोग्य सभापती वैशाली नाईक यांनी तातडीने शाळेत धाव घेवून पाहणी करून आरोग्य प्रशासनाला याबाबत उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, एकाच मुलाला त्रास झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी केला आहे. असा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी आरोग्य सभापतींना देखील प्राप्त झाल्या होत्या. मात्र उपाशी पोटी लस घेतल्याने त्रास होत असल्याचे स्पष्ट केल्यावर ही मोहीम सुरू ठेवण्यात आली.

एका विद्यार्थिनीला हातात लस दिल्यावर रक्त आल्याची घटना घडली आहे. मात्र आता योग्य दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र मुलांना त्रास होत असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमावर फिरत असल्याने पालक संभ्रमात पडले आहेत. आरोग्य विभागाने याबाबत अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्रास होत असलेल्या मुलांना शाळेतच अर्धा तास निगराणी खाली ठेवून मग घरी पाठवले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More