गोवंडी येथे टुरिस्ट चालकाची मारहाण करुन हत्या – eNavakal
गुन्हे मुंबई

गोवंडी येथे टुरिस्ट चालकाची मारहाण करुन हत्या

मुंबई – गोवंडी येथे राहणार्‍या सलीम गुलाम शेख या टुरिस्ट चालकाची तिघांनी मारहाण करुन हत्या केली. या हत्येनंतर तिन्ही आरोपी पळून गेले असून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. या तिघांची ओळख पटली असून लवकरच तिन्ही मारेकरी पकडले जातील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक पगारे यांनी सांगितले. एका खाजगी कंपनीत टुरिस्ट चालक म्हणून काम करणारा सलीम हा गोवंडीतील शिवाजीनगर, प्लॉट क्रमांक 27 मध्ये राहत होता. सोमवारी सायंकाळी कारने अहिल्याबाई होळकर मार्गावरील सी. टी रुग्णालयासमोरुन जात होता. यावेळी ओव्हरटेकवरुन त्याचे तीन तरुणांशी वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. तिघांनीही त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली, नंतर त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच घटनास्थळी गेलेल्या शिवाजीनगर पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अनस अख्तर कुरेशी या तरुणाने दिलेल्या जबानीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

राज्यभरात 316 बेकायदा स्कूल बसवर कारवाई! पंधरा दिवसात दोन लाखांचा दंड वसूल

मुंबई- पुरेशी आसने नसतानाही विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून त्यांची शाळेत ने आण करणार्‍या बेकायदा स्कूलबस विरोधात राज्य सरकारने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 15...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या

कोलकात्यात एलफिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती, चेंगराचेंगरीत २ ठार

कोलकाता – मुंबईत २९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन स्टेशनच्या पादचारी पुलावर अशाचप्रकारे चेंगराचेंगरी होऊन त्यात २३ जणांचा मृत्यू झाला होता. अश्याच प्रकारची घटना आज सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

माझी पत्नी बांधील नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुंबई गोवा क्रुझवर मिसेस फडणवीस यांनी घेतलेल्या सेल्फीमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo सेक्रेड गेम्स २ चा मार्ग मोकळा

मुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत प्रसिद्ध सिरीज सेक्रेड गेम्स चे भवितव्य धोक्यात आले होते. सेक्रेड गेम्स चे लेखक वरूण ग्रोवर यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा...
Read More