गोळी लागूनही गंभीर जखमी आईने दिला गोंडस मुलीला जन्म – eNavakal
देश

गोळी लागूनही गंभीर जखमी आईने दिला गोंडस मुलीला जन्म

नवी दिल्ली – जम्मूतील सुंजवा येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यात लष्कराचे 5 जवान शहीद झाले. एकीकडे दुःखाचे डोंगर कोसळले असताना आनंदाची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 35 आठवड्यांच्या गर्भवतीने रात्रभर मृत्यूशी झुंज देत एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सुंजवाँमध्ये सैन्याच्या कॅम्पमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात राइफलमॅन नजीर अहमद यांच्या पत्नी शाझदा यांनी सुरक्षित ठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला. पण अंदाधुंद गोळीबारात एक गोळी शाझदाला लागली. गंभीर जखमी शाझदाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तात्काळ सतवारी येथील सैन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आई व मुलीची प्रकृती स्थिर असून शाझदा यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय तर मुलीला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. शाझदा यांनी 2.5 किलोग्रॅम वजनाच्या एका गोंडस मुलीला जन्म दिला. शाझदाने डॉक्टरांचे आभार मानत म्हटले की, डॉक्टरांनी फक्त माझेचं नाही तर माझ्या मुलीचेही प्राण वाचवले.

एचओडी कर्नल ज्योती जोशी यांनी सांगितले की, जेव्हा शाझदाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा तिची प्रकृती  गंभीर होती. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शाझदा आणि तिच्या बाळाला वाचविण्यासाठी कबस कसली. एका रात्रीत शाझदा यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्यांदा शाझदाच्या शरीरातील गोळी काढण्यात आली त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More