गोरेगावमध्ये नाल्यात पडलेल्या मुलाचा शोध सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको – eNavakal
News मुंबई

गोरेगावमध्ये नाल्यात पडलेल्या मुलाचा शोध सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको

मुंबई- गोरेगाव येथील आंबेडकर नगराच्या इटालियन कंपनी शेजारील नाल्यात दीड वर्षाचा मुलगा पडल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आणि आज 24 तास उलटून देखील अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मुलगा वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात असून अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि एनडीआरएसचे पथक, पालिका कर्मचार्‍यांकडून आज गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध सुरु होता, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. या घटनेला पालिका जबाबदार असल्याचा आरोप लोकांकडून होत आहे. आज सकाळी स्थानिकांनी रास्तारोको करुन आपला संताप व्यक्त केला. माझा मुलगा मिळला नाही तर मी आत्महत्या करीन, अशा इशारा मुलाच्या वडीलांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडीलांना ताब्यात घेतले.
दिव्यांश सिंह या चिमुरड्याचे नाव असून गोरेगाव पूर्व येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकात दिव्यांश खेळत असताना रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यात पाय घसरून तो पडला. दिव्यांश जेव्हा नाल्यात पडला, त्यावेळी या परिसरात कोणीच नव्हते. काही वेळाने त्याची आई त्याला शोधण्यासाठी आली असता, मुलाचा शोध लागत नसल्याने तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथील स्थानिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिल्यानंतर शोधकार्य सुरु केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच! आज सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत ५२४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुग्णांनी पुन्हा ५०० चा आकडा ओलांडला असून आज ५२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
Read More