गोरेगावमध्ये ‘जेराई फिटनेस’ची रंगत – eNavakal
महाराष्ट्र

गोरेगावमध्ये ‘जेराई फिटनेस’ची रंगत

मुंबई- व्यायामाची आवड असणार्‍या फिटनेस प्रशिक्षक होण्याचे व स्वतःची जिम सुरू करण्याचे स्वप्न  उराशी बाळगणार्‍या युवकांना मदतीचा हात देण्याची योजना ‘जेराई फिटनेस’ या देशातील अग्रगण्य फिटनेस व व्यायाम उपकरणे बनवणार्‍या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राय यांनी आखली आहे. त्यासाठी येत्या 9 व 10 डिसेंबरला गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात ‘जेराई फिटनेस’ महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणार्‍या युवकांना 25 लाख रुपयांच्या पारितोषिकांसह 30 लाख रुपयांची व्यायाम उपकरणे बक्षिसादाखल दिली जाणार आहेत.
गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित ‘जेराई क्लासिक’ फिटनेस स्पर्धेचे परीक्षक म्हणून जागतिक फिटनेस ‘महागुरू’ जान लुकास, जेटी फेबर आणि शॉन व्हॅन लोगेन्बर्ग हे काम पाहणार आहेत. स्पर्धेतील 20 विजेत्यांना स्वतःची व्यायामशाळा, जिम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक सहाय्य तसेच व्यायामाची हायटेक उपकरणे ‘जेराई फिटनेस’ देणार असल्याची घोषणाही राजेश राय यांनी केली. देशात महिलांतही फिटनेसची जागृती वाढत आहे. पण महिला फिटनेस ट्रेनर्सची मात्र वानवा आहे. त्यासाठीच मुलींना महाराष्ट्रात स्वतःची व्यायामशाळा सुरू करण्यासाठीही जेराई फिटनेस विशेष सहकार्य करणार आहे, असेही राय म्हणाले.
2020 पर्यंत भारत हा जगातला सर्वात तरुण देश बनेल. त्या वेळी 15 ते 30 वयोगटातील भारतीयांची लोकसंख्या 45 कोटींच्या घरात असेल. या स्थितीत क्रीडा, शरीरसौष्ठव आणि फिटनेस या क्षेत्रात नव्या रोजगारांच्या संधी युवकांना मिळणार आहेत. येत्या काही वर्षांत हायटेक व्यायामशाळांची संख्या वेगाने वाढेल. त्यामुळे व्यायाम मार्गदर्शक व फिटनेस प्रशिक्षकांची मागणी खूप वाढणार आहे. त्यामुळे फिटनेस उद्योगाला उज्ज्वल भवितव्य आहे, असेही राय यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More