गोपाळ शेट्टींचा भारी ‘कॉन्फिडन्स’, २ हजार किलो मिठाईची दिली ऑर्डर – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय

गोपाळ शेट्टींचा भारी ‘कॉन्फिडन्स’, २ हजार किलो मिठाईची दिली ऑर्डर

मुंबई – लोकसभा निवडणुकीचे निकाल यायला दोन दिवस बाकी असताना उत्तर मुंबईतील भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी चक्क विजयाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली मधील एका मिठाईच्या दुकानात तब्बल २००० किलो मिठाईची ऑर्डर दिली आहे. गोपाळ शेट्टींना कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे तगडे आव्हान आहे. मात्र विविध एक्झिट पोल्सचे अंदाज आणि विजयाची खात्री असल्याने शेट्टी यांनी मिठाईची ऑर्डर दिली असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

विविध एक्झिट पोल्सनी भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवला आहे. उत्तर मुंबई भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ ला गोपाळ शेट्टी यांनी सर्वप्रथम उत्तर मुंबईतून निवडणूक जिंकली होती. यंदा गोपाळ शेट्टी यांना विजयाचा पूर्ण आत्मविश्वास असून निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी मिठाईची ऑर्डर दिली आहे. गोपाळ शेट्टी यांच्याकडून आम्हाला १५०० ते २००० किलो मिठाईची ऑर्डर मिळाली आहे असे दुकानदाराने सांगितले. मिठाई बनवणारे कारागिर तर पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याचा मास्क लावून मिठाई बनवत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More