गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा – eNavakal
News देश न्यायालय

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा

गोंदिया – गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या विरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार 12 डिसेंबर 2017 रोजी नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यानंतर सहा महिन्यात पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र, नव्याने निवडून येणार्‍या खासदाराला खूप कमी कालावधी मिळेल आणि तेवढ्या कमी कालावधीसाठी पोटनिवडणुकीवर 14 कोटींचा खर्च करणे योग्य नाही, अशा आशयाची याचिका गोंदिया जिल्ह्यातील प्रमोद गुढधे यांनी दाखल केली होती.
पोटनिवडणूक झाल्यास नवीन खासदाराला पुरेसा म्हणजेच सुमारे एक वर्षांचा कालावधी मिळणार आहे. तसेच कुठल्याही क्षेत्राच्या जनतेला प्रतिनिधीशिवाय ठेवता येत नाही, अशी दोन कारणे देत उच्च न्यायालयाने प्रमोद गुढधे यांची याचिका निकाली काढली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More