गुलजारपुरा स्मशानभूमीवरून अकोला मनपा सभेत राडा – eNavakal
News महाराष्ट्र

गुलजारपुरा स्मशानभूमीवरून अकोला मनपा सभेत राडा

अकोला- अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज स्मशानभूमीच्या अतिक्रमाणावरून नगरसेवकांमध्येच राडा झाला. महापौर आणि आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमवण्यात आला. आज सकाळी 11 वाजता अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच शिवसेना आणि एमआयएमच्या दोघा नगरसेवकांनी राडा केला. सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असतांनाच शिवसेनेचे नगरसेवक शशी चोपडे यांनी नुकत्याच सुरू होऊन बंद पडलेल्या महापालिकेच्या कॉन्व्हेंटचा विषय उचलून धरला. स्मशानभूमीचा विषय अर्ध्यावरच राहिल्याने एमआयएमचे मुस्तफा यांनी शशी चोपडे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये वाद वाढत गेला. हा वाद एकवढा वाढला की दोघांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारत सामानाची तोडफोड केली. दरम्यान चोपडे यांनी

मुस्तफा यांच्या धार्मिक भावनांवर घाव घातले आणि सभागृहात एकच हलळकल्लोळ माजला. शेवटी काही नगसेवकांनी मध्यस्ती केली आणि नगरसेवक साजिद खान पठाण यांनी माफी मागितली आणि प्रकरण शांत झाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

मला वडिलांच्या लग्नाला आईने तयार केले – सारा

नवी दिल्ली – कॉफी विथ करन सीजन ६ मध्ये अलीकडेच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान दोघे आले होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More