गुप्टिलच्या जागी जिमी निशमला न्यूझीलंड संघात स्थान – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

गुप्टिलच्या जागी जिमी निशमला न्यूझीलंड संघात स्थान

वेलिंग्टन – भारताविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीमुळे न खेळू शकलेला न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल याला टी20 मालिकेला मुकावे लागणार आहे. गुप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरिक्षणाखाली उपचार घेत आहे. मात्र तो लवकर तंदुरुस्त होऊ शकत नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. गुप्टिलच्या जागी न्यूझीलंडच्या संघात जिमी निशम या स्फोटक फलंदाजाला स्थान देण्यात आले आहे.

भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात जिमी निशम याने दणकेबाज खेळी केली होती. त्याने 32 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. मात्र साथीदार फलंदाजबरोबर गैरसमज झाल्यामुळे तो धावबाद झाला पण टी20 सामन्यांमध्ये त्याचा हा फॉर्म सुरु राहिल्यास भारतासाठी तो डोकेदुखी ठरू शकतो. दरम्यान, शनिवारी सरावादरम्यान गुप्टिलच्या कमरेला जखम झाली होती. त्यानंतर फिजियो विजय वल्लभ आणि सिक्योरिटी मॅनेजर टेरी मिनिश यांच्या मदतीने गुप्टिलने मैदान सोडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More