गुड न्यूज! केदार जाधव विश्वचषकासाठी ‘तंदुरुस्त’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

गुड न्यूज! केदार जाधव विश्वचषकासाठी ‘तंदुरुस्त’

मुंबई – टीम इंडियासाठी गोड बातमी आहे. महाराष्ट्राचा मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव फिट झाला असून तो 30 मे पासून इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार्‍या वर्ल्ड कपसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्जही झाला आहे. फिजीओथेरपीस्ट पॅट्रीक फरहातने आपला अहवाल बीसीसीआयला सादर केला असून त्यामुळे तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने आयपीएलमधून माघारही घेतली होती. त्यानंतर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केदार काही दिवस वास्तव्याला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येथील प्रशिक्षण केंद्रात केदारने पॅट्रीक फरहात यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस टेस्ट पास करत विश्वचषकासाठी आपलं नाव पक्क केलं. केदारच्या अनुपस्थितीत अंबाती रायडू-अक्षर पटेल यांची नाव चर्चेत होती.

गेल्या काही वर्षात केदारने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा पक्की केली होती. केदारने आतापर्यंत 59 वन-डे सामन्यांमध्ये 1174 धावा केल्या आहेत. 43-50 च्या सरासरीने केदारने आतापर्यंत दोन शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. याचसोबत केदार जाधवने आतापर्यंत 27 बळी घेत, अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या स्पर्धेत केदार कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More