गुजरात राज्यातील दरोड्यातील आरोपीस अटक – eNavakal
News मुंबई

गुजरात राज्यातील दरोड्यातील आरोपीस अटक

मुंबई – गुजरात राज्यातील पाटण येथे गोळीबारासह एका अंगाडियाला घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा घालणार्‍या एका मुख्य आरोपीस कुर्ला परिसरातून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. साहिल अहमद शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यांत त्याचा एक सहकारी सुधीर दत्तात्रय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. दरोड्यानंतर झालेल्या पोलीस चकमकीनंतर ते दोघेही पळून गेले होते. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई आणि गुजरात राज्यात अनेक अधिक गुन्ह्यांची नोंद असून लवकरच त्याचा ताबा गुजरात पोलिसांकडे सोपविण्यात येईल असे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी सांगितले.
13 ऑगस्ट 2019 रोजी पाटण सीटीबी डिव्हीजन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अंगाडियाला चौदाजणांच्या एका टोळीने घातक शस्त्रांच्या धाकावर लुटले होते. त्याच्याकडील सुमारे पावणेसात लाख रुपयांचे हिरे आणि कॅश घेऊन या टोळीने पलायन केले होते. आरोपी पळून जाताना त्यांना स्थानिक पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला होता. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार करुन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला होात. त्यापैकी काही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत साहिलचे नाव उघडकीस आले होते, मात्र पोलीस चकमकीनंतर भीतीपोटी तो गुजरात येथून मुंबईत पळून आला होता. तेव्हापासून तो मुंबई शहरात नाव बदलून राहत होता. साहिल हा मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हिंदूराव चिंचोलकर यांना मिळाली होती. या माहितीनंतर जगदीश साईल यांच्या पथकाने साहिलला कुर्ला येथील एस. जी. बर्वे रोडवरुन शिताफीने अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हे शाखेत एका गुन्ह्यांची नोंद होती. याच गुन्ह्यांत तो अजामिनपात्र वॉरंटवर होता. त्यामुळे अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More