गुजरात आणि कर्नाटक स्फोटांनी हादरले! कर्नाटकात 6 ठार, गुजरातला 24 जखमी – eNavakal
News देश

गुजरात आणि कर्नाटक स्फोटांनी हादरले! कर्नाटकात 6 ठार, गुजरातला 24 जखमी

नवी दिल्ली – आज भल्या पहाटे देशात दोन ठिकाणी स्फोटांच्या 2 घटना घडल्या. यात पहिला स्फोट गुजरातमधील एका केमिकल कंपनीत झाला. तेथे स्फोटानंतर लागलेल्या आगीत 24 जण भाजून जखमी झाले आहेत. तर दुसरी घटना कर्नाटकात घडली. तेथे जिलेटिन कांड्याच्या झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे ही दोन राज्ये हादरले आहेत.
आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झगडिया येथील केमिकल कंपनीत स्फोट झाला.

त्यानंतर तेथे उसळलेल्या आगडोंबांत 24 जण भाजून जखमी झाले. या स्फोटामुळे येथील सुमारे 10 किलोमीटरचा परिसर हादरला. यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांची झुंज देऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दुसर्‍या घटने कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथील हिरेनगावल्लीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. त्यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटामुळे अनेक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. ही घटना पहाटे 1.15 च्या सुमारास घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आणि त्यातील दोषींवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुरुप्पा यांनी दिले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केले आहे. एका महिन्यात कर्नाटकमध्ये झालेला हा दुसरा स्फोट आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

गुजरात आणि कर्नाटक स्फोटांनी हादरले! कर्नाटकात 6 ठार, गुजरातला 24 जखमी

नवी दिल्ली – आज भल्या पहाटे देशात दोन ठिकाणी स्फोटांच्या 2 घटना घडल्या. यात पहिला स्फोट गुजरातमधील एका केमिकल कंपनीत झाला. तेथे स्फोटानंतर लागलेल्या आगीत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचे धोबीपछाड! महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी विजयी

सांगली-  बंडखोरी टाळण्यात अपयश आल्यामुळे सांगलीतील महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपला मोठा हादरा बसला आहे. आज सकाळी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या...
Read More
post-image
News विदेश

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत ब्रिटनमध्ये बंदी

लंडन- ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कुख्यात गुंड रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई- कुख्यात गुंड रवी पुजारीला आज कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी...
Read More
post-image
देश

पाच राज्यांकडून पेट्रोल-डिझेलवर करकपात

नवी दिल्ली – दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि केंद्र व राज्य सरकारकडून...
Read More