गुजराती विरुद्ध गुजराती वाराणसीत लढणार! – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

गुजराती विरुद्ध गुजराती वाराणसीत लढणार!

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मात देण्याची योजना मुलायमसिंग व अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने आणि मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने आखली आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून हार्दिक पटेल यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पटेल हे मोदींच्याच गुजरातमधील पाटीदार समाजाचे लोकप्रिय नेते आहेत.
गेल्या 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी मोदी यांच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता. म्हणूनच सपा व बसपा शनिवारी हार्दिक पटेल यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचाच भाग म्हणून हार्दिक पटेलसारख्या लोकप्रिय व देशभर कुतूहल निर्माण करणार्‍या नेत्याला मोदींच्या विरोधात वाराणसीतून उमेदवारी देण्याचा घाट उत्तर प्रदेशातील एकेकाळच्या दोन सत्ताधारी पक्षांनी घातला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता हार्दिक पटेलांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते.
समाजवादी पार्टी येत्या लोकसभा निवडणुकीत 37 जागा व बहुजन समाज पार्टी 37 जागा लढविणार आहे. राहुल गांधींच्या अमेठी आणि सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघात सपा-बसपा उमेदवार उभे करणार नाही. उरलेल्या चार जागा राष्ट्रीय लोकदल व अन्य मित्रपक्षांना दिल्या जातील. त्यामुळे काँग्रेस व इतर पक्ष हार्दिक पटेल यांच्या विरोधात वाराणसीत उमेदवार उभा करणार नाहीत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More