गुजरातला पळून गेलेल्या हिरे दलालास अटक व पोलीस कोठडी – eNavakal
News गुन्हे

गुजरातला पळून गेलेल्या हिरे दलालास अटक व पोलीस कोठडी

मुंबई – कोट्यवधी रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या क्षितीज भन्साली नावाच्या एका 32 वर्षांच्या हिरे दलालास बीकेसी पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हिर्‍यांना चांगली किंमत मिळवून देण्याचे आमिष दाखवून क्षितीजने आतापर्यंत सात हिरे व्यापार्‍यांना सुमारे एक कोटी रुपयांचा गंड घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांचे वांद्रे येथील बीकेसी, भरत डायमंड बोर्समध्ये एक खाजगी कार्यालय आहे. एप्रिल 2017 रोजी त्यांची एका परिचित व्यक्तीच्या मदतीने क्षितीजशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो हिरे दलाल असून त्याच्या संपर्कात अनेक हिरे व्यापारी आहेत. त्यांच्या मदतीने आपण त्यांच्याकडील हिर्‍यांना चांगली किंमत मिळवून देऊ असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला काही हिरे दिले होते, एक महिन्यांत हिरे किंवा हिर्‍याच्या विक्रीतून आलेले पेमेंट कार्यालयात जमा करु असे त्याने आश्वासन दिले होते. मात्र काही महिने उलटूनही क्षितीज हा आला नाही. त्याच्याविषयी माहिती काढल्यानंतर तो पळून गेल्याचे त्यांना समजले होते. त्याने त्यांच्यासह इतर सात हिरे व्यापार्‍यांना अशाच प्रकारे बतावणी करुन त्यांच्याकडून हिरे घेतले होते. या हिर्‍यांचे अपहार करुन फसवणुक करुन तो मुंबईतून गुजरातला पळून गेला होता. आतापर्यंत त्याने सात हिरे व्यापार्‍याकडून सुमारे एक कोटी रुपयांचे हिरे घेतले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी क्षितीज भन्सालीविरुद्ध 406, 420 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याला गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More