गुजरातमध्ये भाजप 120 पेक्षा  अधिक  जागा जिंकणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले  – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

गुजरातमध्ये भाजप 120 पेक्षा  अधिक  जागा जिंकणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

वडोदरा –  गुजरात चे सुपूत्र म्हणून प्रधानमंत्री पदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर गुजरात च्या जनतेला अभिमान आहे . गुजरातच्या सर्व धर्मीय जनतेचा  मोदींवर असलेल्या  विश्वासामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ला 120 पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त होईल  त्यात दलितांच्या मतांचा ही सिंहाचा वाटा असेल  असा विश्वास  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त  केला.  गुजरात विधानसभा निवडणुकीत रिपाइं चा भाजप ला विनाअट पाठिंबा आहे .वडोदरा येथील बलराम खावणी या सिंधी समाजाच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित  जाहीर सभेत ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर रिपाइंचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी ; लिलाबेन वाघेला  आदी मान्यवर उपस्थित होते.
मणिशंकर अय्यर म्हणाले नीच पण नरेंद्र मोदी आहेत मनाने रिच 
अय्यरच्या स्टेटमेंटमुळे खराब झाले काँग्रेसचे पिच 
अशी आपल्या शैलीत कविता सादर करून ना रामदास आठवलेंनी काँग्रेस वर चौफेर टीका केली. पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल ने काँग्रेस ला पाठिंबा देऊन त्या समाजाचे नुकसान केले आहे. राहुल गांधींनी कितिही प्रयत्न  केले तरी काँग्रेस ला मोदींच्या नेतृत्वापुढे  गुजरात मध्ये यश मिळू शकत नाही. त्यामुळे हार्दिक  पटेल ने म  पाटीदार आरक्षणासाठी भाजप लाच पाठिंबा द्यायला पाहिजे होता मला त्यांनी संपर्क साधला असता तर मोदींशी आपण त्यांचा समेट घडवून दिला असता. त्यामुळे पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता.  प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहमी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे.  मोदींनी संविधान गौरव दिन देशभर साजरा करण्यास प्रारंभ केला आहे त्यामुळे त्यांच्याबाबत काँग्रेस ने कितीही अपप्रचार केला तरी त्या प्रचाराला  कोणी महत्व देत नाही.  देशभरातील आंबेडकरी जनतेने  काँग्रेस कडे पाठ फिरवली गुजरात मध्येही काँग्रेस ला पराभवाची धूळ खावी लागेल असे प्रतिपादन ना रामदास आठवले म्हणाले .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More