गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार खासदार संजय काकडेंचा घरचा आहेर – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार खासदार संजय काकडेंचा घरचा आहेर

पुणे – गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच भाजपला पक्षातूनच पुन्हा एकदा घरचा आहेर मिळाला आहे. गुजरात निवडणुकीत पक्षाचा पराभव होणार, असे धक्कादायक वक्तव्य करून भाजपचे खासदार संजय काकडे यांनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
गुजरातमधील या निवडणुकीत भाजपची स्थिती फार गंभीर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असल्यामुळे यावेळी भाजपला नकारात्मकतेचा मोठा फटका बसू शकतो. खास करून राज्यातील मुस्लीम समाज प्रचंड नाराज आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींचे राज्यातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मोदींएवढा सक्षम नेता मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाला मिळू शकलेला नाही. ज्या प्रकारे हार्दिक पटेलची ‘सेक्स सीडी’ आली तेही चुकीचे होते. तसेच निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारादरम्यान विकासाचा मुद्दा प्रमुख बनलाच नाही. या सर्व मुद्यांचा विचार करता आपण काही जणांना सर्वेक्षणासाठी पाठवले होते. भाजपला निवडणुकीत पराभवाचा धक्का बसेल, असे सर्वेक्षणातून निष्पन्न होत असल्याचे काकडे यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
महाराष्ट्र

ज्योतिबा डोंगराचे सर्व रस्ते सील

कोल्हापूर – दरवर्षी आज ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू होते. हजारो भाविक आजच्या दिवशी डोंगरावर येतात. मात्र आज केवळ मोजक्या पुजाऱ्यांनी पूजा केली. कोरोनामुळे ज्योतिबाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

ससून रुग्णालय अजून सज्ज का नाही?

पुणे – ससून रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. तिथे कोरोना रुग्णांसाठी ८५० खाटांचे स्वतंत्र दालन सुरू होऊ शकते. हे दालन सुरू होईल असे...
Read More