गुजरातमध्ये पटेलांची नाराजी हार्दिक आणि पाटीदार आंदोलन – eNavakal
देश राजकीय

गुजरातमध्ये पटेलांची नाराजी हार्दिक आणि पाटीदार आंदोलन

छोटी वावटळ म्हणून ज्या घटनेकडे आधी कोणीच लक्ष दिले नाही, ती घटना आता एका वादळात रुपांतरित झाली आहे आणि तिने भल्याभल्यांची झोप उडविली आहे. राजकारणाचे अभ्यास या घटनेकडे अचंबित होऊन पहात आहेत. सोशल मीडियाला एव्हरग्रीन विषय मिळाला आहे. सगळ्यांचीच गणिते चुकविणार्‍या या हार्दिक पटेलकृत पाटीदार आंदोलनाचा विषय ‘केस स्टटी’ म्हणून अभ्यासण्याजोगा झाला आहे. हे आंदोलन सामाजिक आहेच, तसेच राजकीय पण आहे. ‘क’च्या बाराखडीतील सगळे प्रश्न विचारून झाले तरी पाटीदार आंदोलनाची आग संपूर्ण गुजरातमध्ये पसरली आहे. भाजपएवढीच काँग्रेसनेही त्याची झळ अनुभवली आहे. म्हणून हा ‘वणवा’ शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने पटेलांना झुकते माप देऊन तिकीट वाटपात हात सैल सोडला. यंदा भाजपचे पाटीदार उमेदवार-53, काँग्रेसचे 47.
या पाटीदार आंदोलनाचा उगम कुठून झाला? जन्म कसा झाला? कोणाला कळलेच नाही की एक छोटासा मतप्रवाह धो-धो धबधब्यात रुपांतरित होईल. मुख्यत्वे शेती उद्योगाशी निगडीत असलेला हा पटेल समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, असा साधारण समज होता. पण वारंवार पडणारा दुष्काळ, अनियमित पाऊस यामुळे शेतीच्या उत्पन्नावर चरितार्थ चालवणे अवघड वाटू लागले आणि हे पटेल पर्याय शोधण्याच्या गरजेने अहमदाबाद आणि सुरतमध्ये स्थलांतरित व्हायला सुरुवात झाली. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत गेले. आज अशी परिस्थिती आहे की, सौराष्ट्रच्या प्रत्येक खेडेगावात तरुणांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांची शेतीमधील रुची घटली आहे. रोजगारासाठी ते जवळच्या शहरांमध्ये जात आहेत. आता स्थिती अशी आहे की, पटेल शेतीपासून दूर झालेत आणि त्यांची जमीन गोधटा आणि पंचमहाल जिल्ह्यातील कुळं कसत आहेत.
अहमदाबाद आणि सुरतमध्ये सुरुवातीला नोकरी करून नंतर व्यवसायात शिरलेले पटेल आता स्थिर संपन्न आहेत. हिरे उद्योगात त्यांनी पाय पसरले आहेत. कापड उद्योग, रियल इस्टेट एवढेच काय इंजियनिअरींग, मशीनरी क्षेत्रातसुद्धा पटेलांचाच बोलबाला आहे. गावात राहिलेला समाज थोडा कमकुवत राहिला आणि शहरातला मजबूत नवश्रीमंत शहरी पाटीदारांनी आपापल्या मूळ गावी खूप सुधारणा केल्या, चांगले बंगले बांधले, उत्तम सुखसोयी वाढवल्या पण नोकर्‍या निर्माण करण्याचे कार्य दुर्लक्षित राहिले तसेच पटेलल्या मुलींनी जुनाटपणा सोडून शिक्षण क्षेत्रात चांगलीच प्रगती केली. आता खेडेगावातल्या कमी शिकलेल्या आणि शेती करणार्‍या तरुणांचे वांदे झालेना शहरातल्या मुलींनी खेड्यात जायला नकार द्यायला सुरुवात केल्यावर खेड्यातले युवक काय करणार? नाइलाजाने ते शहरात जाऊ लागले. एक पानाचा गल्ला सुरू करतात. हळूहळू सेटल होतात. मग लग्नाचे मार्केट त्यांना अनुकूल होते. अभावाच्या स्थितीत पटेलांनी आपला प्रभाव पाडला. पण शेती संपल्यामुळे वाढलेल्या बेकरीवर संपूर्ण तोडगा त्यांना सापडला नाही. इतर शेतीतील समाजामध्ये बेकारी ही समस्या आहेच. पण पटेल समाज मोठा आहे. त्यांच्या आवाजाला प्रचंड बहुमताचा पाठिंबा आहे. यातूनच पाटीदार आंदोलनाचा जन्म झाला. पटेलांनी राजकारणात शिरकाव केल्यानंतर त्यांचे महत्त्व वाढले पण बेकारी? जैसे थे! शिवाय मोदी शासनाच्या काळात ओबीसी समाजाच्या पटेलांपेक्षा जास्त महत्त्व दिले. गेल्यामुळे पटेलांमध्ये धुसफुस सुरू झाली आणि अशातूनच हार्दिक पटेलला फ्लॅटफॉर्म मिळाला. सुरुवातीला कोण हा हार्दिक म्हणणारे भाजप सरकार, हार्दिकच्या टीमचे वाढते समर्थन बघून घाबरून गेले. विसरून गेले. येनकेन प्रकारे हे आंदोलन दडपण्याचे योग्य अयोग्य प्रयोग करूनही सरकारला अपयशच आले. हार्दिकला प्रचंड पाठिंबा वाढला. लाखांचा पाठिंबा बघून हार्दिकसुद्धा बेफाम झाला. 24 वय त्याच्या आवाजाने सगळा समाज पेटून उठत असेल तर हार्दिक काय कोठलेच पाय जमिनीवर बघणार नाहीत. त्यानंतरच्या घटनांनीच हार्दिक जास्त प्रसिद्ध झाला. भाजपावाले त्याच्या मुळावरच उठले होते. साम, दाम, दंड, भेद शेवटी सेक्स सीडी काही काही म्हणून भाजपाने बाकी ठेवले नाही. हार्दिकने खुलेआम सांगितले की, भाजपने मला 1200 करोडची ऑफर दिली. एवढे करून पण हार्दिक भाजपला पुरून उरला. त्याचा जोर अंतर्गत विचारांमुळे, काहींनी पक्ष सोडल्यामुळे, कैदेत ठेवले गेल्यामुळे, राजद्रोहाचे आरोप ठेवल्यामुळे, थोडासा कमी झाला आहे. हे खरे असले तरी त्याने अजून मैदान सोडलेले नाही. त्याच्या सभेला आजही पाटीदारांची गर्दी असते. हार्दिकचा भाजपला कट्टर विरोध आहे. हे सर्वश्रुत आहे. पण त्याने काँग्रेसला पाठिंबा दिला हेही त्याच्या समर्थकांना आवडलेले नाही. पाटीदार समाज आणि काँग्रसेमध्ये तिकीट वाटपावरून मोठा गदारोळ झाला. पासच्या दबावाने काँग्रेसने त्यांचे अनेक उमेदवार बदलले. या गोंधळाचा मुद्दा करून भाजपाने हार्दिकला चांगलेच धारेवर धरले म्हणे हार्दिकला समाजावरील अन्यायाबद्दल रस नाही. त्याला राजकारणात रस आहे. हार्दिकने काँग्रेसला समर्थन दिले आहे. पण तो स्वतः उभा राहिला नाही. हेच त्याचे अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी पक्षाचे वेगळेपण हार्दिकला किंगपेक्षा किंगमेकर बनवण्यात जास्त रूची आहे.
भाजपने ज्या गंभीरतेने आणि तत्परतेने हार्दिक विरुद्ध मोहीम चालविली आहे. त्यावरून त्यांनी घेतलेली धास्ती दिसत आहे. हार्दिकने केेलेल्या प्रत्येक वक्तव्याचा ते त्वरित समाचार घेतात. हार्दिकच्या आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा झाल्यावर गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी हीन भाषेत त्यावर टीका केली. त्यामुळे काठावरचे पाटीदारसुद्धा त्याच्यापासून दुरावले. भाजपाने पटेलांच्या दोन मुख्य संस्था उमिया धाम-उंझा आणि खोडलधामच्या कार्यकारी मंडळावर दबाव आणून हार्दिकला पाठिंबा देऊ नये म्हणून सगळे प्रयत्न केले. 21 नोव्हेंबरच्या पंतप्रधान मोदींच्या मोरबी येथील सभेच्या दिवशीच हार्दिकची सभा मोरबीमध्येच होती. नंतर जवळच असलेल्या राजकोटमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. दोन्ही कार्यक्रमांमध्ये खोडा घालण्याचा भाजपाने आटोकाट प्रयत्न केला. भाजपचे एकप्रकारे दमनच चालू आहे. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे, तर हार्दिक आणि कंपनीसाठी अस्तित्वाची लढाई आहे. जीवनमरणाची ही लढाई हार्दिकचेही भविष्य ठरविणार आहे.

गांधीनगरच्या मुख्य पाद्रींचे
भाजपाला पराभूत करण्याचे निर्देश
गुजरातमध्ये जातीवादाचे त्रांगड आधीच सुटत नाही. त्यातच आता सांप्रदायिकतेचा गुंता घुसला आहे. गांधीनगरचे मुख्य पाद्री आर्क बिशप थॉमस यांनीसुद्धा एक प्रतिरुपी फतवा जाहीर करून सर्व ख्रिश्चन लोकांना भाजपाला पराभूत करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरातमध्ये आदिवासी आणि दलित समाजामध्ये धर्मपरिवर्तन करून ख्रिश्चन झालेल्यांची संख्या बरीच आहे. हे सगळे हिंदू धर्मांतरीत म्हणजे ओघानेच काँग्रेस धार्जिणे. त्या सगळ्यांना या पत्रातून असा संदेश देण्यात आला आहे की, ज्यांचा घटनेवर विश्वास आहे आणि जे सर्वधर्मियांना समान मान देऊन त्यांना मते द्यायची. यावरून निर्माण झालेल्या वादाला सामोरे जाताना बिशप यांनी असा खुलासा केला की, आमची पद्धत आणि परंपरा आहे ही, आम्ही दर निवडणुकीच्या वेळी असा संदेश पाठवितो. आम्ही कोणाचा दुस्वास करीत नाही आणि राष्ट्रवादी म्हणजे भाजपच आहे असा अर्थ नाही. ज्यांची विचारधारा संकुचित आहे तो पक्ष भाजपला अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करताना त्यांनी पत्रात काही विशेष गोष्टी मांडल्या आहेत. जसे धर्मनिरपेक्षा संकटात आहे. लोकशाहीची वीण उसवत आहे. गरिबांमध्ये असुरक्षितांची भावना वाढीस लागली आहे. या सगळ्या आरोपांचा रोख भाजपकडे आहे. पण यामधील धोका असा आहे की, अल्पसंख्याक आणि सवर्णांमध्ये तणाव वाढू शकतो. भाजपच्या हातात आयतेच कोलीत आले आहे. निवडणूक आयोगाने या पार्श्वभूमीवर आर्क बिशपना नोटीस पाठवून या पत्रासंदर्भात अधिक खुलासा करण्यास सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

येत्या दहा वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही – चंद्रकांत पाटील 

कल्याण –  राज्यभरातील रस्त्यांवर येत्या १० वर्षात एकही खडडा दिसणार नाही.असे रस्ते शासनाच्यावतीने तयार केले जातील असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
Read More