गुजरातमधील भूमाफियांसाठीच नाणारच्या रिफायनरीचा सरकारकडून घाट – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

गुजरातमधील भूमाफियांसाठीच नाणारच्या रिफायनरीचा सरकारकडून घाट

रत्नागिरी- गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायनरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. कवडीमोलदराने या जमिनी लँड माफियांनी विकत घेतल्या असून, या जमिनिंना नंतर लाखो रुपये मोबदला मिळू शकतो. आणि त्यांच्यासाठीच हा रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. गुजरातचे लँड माफिया अब्जोधीश होतील, पण कोकण भकास होईल. त्यामुळे लवकरच या लँड माफियांची यादी नावासहित यादी जाहीर करू अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.

राणे लोप पावत चाललेलं व्यक्तिमत्व
कोकणातील ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी यापूर्वी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन आणि आता नाणार रिफायनरीला विरोध केला आहे याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता, त्यांच्या भूमिकेबाबत मला बोलायचं नाही, पण राणे म्हणजे लोप पावत चाललेलं व्यक्तिमत्व असल्याची टीका यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More