गुगलने दोनदा नाकारलं आणि फ्लिपकार्टचा जन्म झाला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

गुगलने दोनदा नाकारलं आणि फ्लिपकार्टचा जन्म झाला

बेंगळुर – देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टचा सहसंस्थापक बिनी बन्सल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. गुगलनं माझा सीव्ही दोन वेळा नाकारला आणि फ्लिपकार्टचा जन्म झाला, असा खुलासा बिनी बन्सल यांनी बेंगळुरमध्ये एका कार्यक्रमामध्ये केला.

2005 व 2006 साली मी गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सीव्ही पाठवला होता. पण दोन्हीदा गुगलने त्यांचा सीव्ही नाकारला होता. त्यांच्या मेलला कधीच गुगलने सकारात्मक उत्तर दिलं नव्हतं. ‘गुगलमध्ये तेव्हा नोकरी मिळाली असती तर मी फ्लिपकार्टचा विचारही कधी केला नसता’ अशी भावना बन्सल यांनी व्यक्त केली आहे. यावेळी माझी पत्नी फ्लिपकार्टवरून फळं खरेदी करत नसल्याची माहिती बिनी बन्सल यांनी दिली आहे. अनेकदा सांगूनही माझी पत्नी रोज ऑनलाइन जाते आणि बिग बास्केटवरून खरेदी करते. मी तिला कितीदा सांगितलं की तू फ्लिपकार्टवरून फळांची खरेदी कर पण ती कधीच ऐकत नाही’ अशी खंत बिनी बन्सल यांनी व्यक्त केली.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

मला वडिलांच्या लग्नाला आईने तयार केले – सारा

नवी दिल्ली – कॉफी विथ करन सीजन ६ मध्ये अलीकडेच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान दोघे आले होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More