गुंडाना राजश्रय दिला जात आहे – नीलम गोर्हे – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

गुंडाना राजश्रय दिला जात आहे – नीलम गोर्हे

रत्नागिरी – राज्यात गुंडाना राजश्रय दिला जात आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था खिळखिळी होत आहे, असे सांगून शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोर्हे यानी भाजपवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आल्या असता आज त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्यावर सत्ता गाजवत असताना शासन म्हणून सर्वसमावेशक निर्णय अपेक्षित असते, मात्र आज गुंडासह अपप्रवृत्तींना पक्षात प्रवेश दिले जात आहेत, त्यामुळे शिक्षा होण्याचे प्रमाण कमी हाऊन पोलिसांवर देखील दबाव आणला जात असल्याची टिका आमदार गोर्हे यानी केली. त्यांचा निशाना थेट भाजपवर होता. राम मंदिराच्या मुद्यावरुन बोलताना त्या पुढे म्हणाल्या की बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू एकतेचा विचार दिला, हाच मुद्दा घेऊन भाजपने निवडणूका लढवल्या, ते सत्तेत आले मात्र ‘मंदिर वही बानयेंगे लेकिन तारीख नही बताएंगे’ अशा भूमिकेत ते वागत असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला.

उद्धव ठाकरे रामभक्त म्हणून अयोध्येला जाणार असल्याच सांगून संत महंतांचा विश्वास देखील शिवसेनेवर असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. केंद्र व राज्य सरकारबाबत बोलताना त्या कभी खुशी कही गम असे वातावरण असल्याचे म्हणाल्या. समाजात जातीच्या नावाखाली वातवरण गढूळ केलं आहे, एवढं गढूळ वातवरण का असा सवाल उपस्थित करत त्यामागे कोण? असं म्हणत ‘कही पे निगाहे, कही पे निशाणा’ असे सांगत त्यांनी मित्र पक्षच यामागे असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला. 2019च्या निवडणुकीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की 23 जानेवारीला स्वतंत्र लढू असा आमचा ठराव झाला आहे, आमचा पक्ष आदेशावर चालतो, त्यामुळे 2019 मध्ये स्वतंत्र लढून शिवसेना राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More