गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम – eNavakal
News महाराष्ट्र

गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम

अहमदनगर- सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने येत्या 2 ऑक्टोबरपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज जलसंधारण खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. या बैठकीत अण्णांना उपोषण न करण्याबात विनंती केल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत.

अण्णांच्या बहुतेक मागण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मागण्या तांत्रिक स्वरूपाच्या असल्याने त्या लवकरच पूर्ण होणार असल्याचे महाजन म्हणाले. केवळ मागण्या मान्य करून उपयोग नाहीतर त्याची अंमलबजावणीचा निर्णय झाला पाहिजे. सरकारने निर्णय घेऊन लेखी लिहून दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचा पवित्रा अण्णांनी घेतला आहे. केंद्राने लोकपाल नियुक्तीसाठी समिती गठीत केली आहे, मात्र राज्यातील लोकायुक्तांच्या बाबतीत काय?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेतमालाला दीडपट भाव देताना सीटू अधिक 50 चा फॉर्म्युला हवा असा आग्रह धरलेला आहे. ड्रीप आणि स्पिनकलर्सबाबत जीएसटी 12 टक्यावरून 5 टक्के करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या चर्चेदरम्यान केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रस्ते, फूटपाथ खड्डेमुक्त केले जातील महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई -शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि...
Read More
post-image
देश

दुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले

दिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More