मुंबई – रणवीर सिंग आणि आलियाच्या बहुचर्चित ‘गली बॉय’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या आठ दिवसांतच १०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलरच प्रचंड प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 19.४० करोड रुपयांची कमाई केली. रणवीर आणि आलियाच्या भूमिकेला चाहत्यांची अत्यंत पसंती मिळत आहे. रणवीरचा १०० करोड पार करणारा गली बॉय हा सलग तिसरा चित्रपट ठरला आहे.
