गर्भवती महिलेला 800 फूट खोल दरीत फेकले; पतीला अटक – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र मुंबई

गर्भवती महिलेला 800 फूट खोल दरीत फेकले; पतीला अटक

कर्जत – माथेरानच्या 800 फूट खोल दरीत फेकलेल्या गरोदर महिलेला वाचवण्यात पोलिस आणि गिर्यारोहकांच्या पथकाला यश आले आहे. गरोदर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. ही महिला सुमारे ८० फुटांवर अडकल्याने तिची सुखरूप सुटका करण्यात करण्यात आली आहे.

फूट खोल दरीत पडूनही सहा महिन्यांची गर्भवती सुखरूप बचावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माथेरान-नेरळ मिनी ट्रेन ट्रॅकजवळील पेब किल्ल्यानजीकच्या बेडकीची दुलई येथे रविवारी ही घटना घडली. मुंबईतील चर्चगेट येथे राहणारे सुरेश पवार आपली सहा महिन्यांची गर्भवती असलेली पत्नी विजया हिला घेऊन माथेरान येथे फिरायला घेऊन गेले होते. सुरेश आणि विजया यांचा प्रेमविवाह झाला होता. या प्रेमाविवाहातून सुटका मिळवण्यासाठी सुरेशने कड्यावरच्या गणपती पॉईंटपासून तिला 800 फूट खोल दरीत फेकले. नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक आदिवासी, सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ तिला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

 

 

 

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More