गर्भपिशवीतील पावणे तीन किलो वजनाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी – eNavakal
आरोग्य मुंबई

गर्भपिशवीतील पावणे तीन किलो वजनाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई –   “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रुग्णालय” हे ९४० खाटांचे पालिकेचे प्रमुख रुग्णालय जुहू विलेपार्ले (पश्चिम) परिसरात आहे. याच रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका ३६ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवित आढळून आलेली मोठी गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुने केलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल २.७५ किलो वजनाची गाठ सदर महिला रुग्णाच्या पोटातून काढण्यात आली आहे. तसेच या रुग्णाची प्रकृती देखील आता उत्तम आहे, अशी माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.
रुग्णालयातद्वारे कळविण्यात आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कूपर रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात एक महिला पोटदुखी व रक्तस्रावाची आरोग्य विषयक तक्रार घेऊन उपचारासाठी आली होती. या आधीच दोन मुलांची आई असलेल्या व आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील असलेल्या या महिलेचे पोट हे साधारणपणे ७ महिन्यांच्या गरोदर महिलेप्रमाणे दिसत होते. या महिलेची अधिक तपासणी व आवश्यक त्या अत्याधुनिक चाचण्या केल्या असता, महिलेच्या गर्भपिशवीत मोठी गाठ आढळून आली. ही गाठ वाढती असल्याने तसेच या गाठीचा रुग्णाच्या जिविताला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, त्यावेळी महिलेच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण केवळ ४ होते. तसेच सातत्याने रक्तस्राव देखील चालू होता. ज्यामुळे शस्त्रक्रिया करणे धोक्याचे होऊ शकले असते. ही बाब लक्षात घेऊन शस्त्रक्रियेपूर्वी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी व रक्तस्राव थांबविण्यासाठी औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात वाढल्यावर आणि रक्तस्राव थांबल्यानंतर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गाठ अतिशय मोठी असल्याने व ही गाठ काढताना होऊ शकणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा वर्षांचा अनुभव असणा-या अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी स्वत:च सदर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. गणेश शिंदे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. हेमलता कुहिते, डॉ. हेमा रेलवानी, डॉ. नेही पारिख या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सलग दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण महिलेच्या पोटातून २.७५ किलो वजनाची म्हणजेच सुमारे पावणे-तीन किलो वजनाची मोठी गाठ काढली आहे. या शस्त्रक्रियेनंतर सदर महिलेची प्रकृती आता उत्तम आहे.

गर्भाशयातील गाठीची महत्त्वाची लक्षणे –

या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गर्भाशयातील गाठीच्या लक्षणांबाबत माहिती देताना डॉ. गणेश शिंदे यांनी सांगीतले की, गर्भाशयात गाठ असणा-या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे  मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाचा त्रास होणे लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. या प्रकारची लक्षणे आढळून आल्यास महिलांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा व दुखणे अंगावर काढू नये, असेही डॉ. शिंदे यांनी  सांगीतले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More