गणेश विसर्जनाला डीजेवर तूर्तास बंदी – उच्च न्यायालय – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

गणेश विसर्जनाला डीजेवर तूर्तास बंदी – उच्च न्यायालय

मुंबई – गणेशोत्सव म्हटले की डीजेवर चालणारा धांगडधिंगा हा आलाच. मात्र यावर्षी गणेश विसर्जनाला उच्च न्यायालयाने डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर तूर्तास बंदी घातली आहे. परंतु साउंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घालणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. यासंदर्भात आता पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे.

डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे का याविषयी राज्य सरकारला तपशील द्यायचा होता. याशिवाय सण येणार जाणार पण यादरम्यान होणाऱ्या गोंगाटाकडे कशी पाठ फिरवणार असे उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. तर दुसरीकडे प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग असोसिएशनने व्यवसायावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला आहे. मर्यादित डेसिमलपर्यंतचा आवाज असला तरी पोलीस का कारवाई करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी खासदार उदयनराजे यांनीही आपले मत मांडले आहे. पुण्यातल्या सनबर्न कार्यक्रमाला कशी परवानगी मिळते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची दुसरी विकेट; नझमुल हुसेन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More