गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा! पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार – eNavakal
महाराष्ट्र

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा! पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. २२ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पीएमपीएलच्या या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना दळणवळणात मोठी मदत होणार आहे.

ही बससेवा सुरू करावी म्हणून थेट उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी याला तत्वतः मान्यताही दिली. त्यामुळे आता २२ ऑगस्टला पीएमपीएल बससेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमपीएल प्रशासनाने पुढील आठवड्यात बसेस सुरु होतील असे सांगितले आहे. मात्र, निश्चित तारिख सांगितलेली नाही. तरीही गणेश चतुर्थीच्या दिवशी बसेसचा श्री गणेशा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बस सेवा ठप्प असल्याने पीएमपीएलला मोठा प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्चही आवाक्याबाहेर जात आहे. यासंदर्भात सोमवारी पुणे आणि मंगळवारी चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएल प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या निर्णानुसार पहिल्या टप्प्यात साधारण ४०० ते ४५० बसेस शहरात सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बस सेवा सुरु होतील. नागरिकांच्या प्रतिसादानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात पीएमपीएल सुरु होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सिंग सांभाळत मर्यादित प्रवाशांना परवानगी दिली जाणार आहे. बस दिवसातून २-३ वेळा निर्जंतूक केली जाईल. प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू

नागपूर –  काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली. ऊसरे हे काँग्रेसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा! पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर पीएमपीएल...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीचे 3 दरवाजे पुन्हा उघडले

कोल्हापूर- गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागडसह अनेक गावे संपर्काबाहेर

गडचिरोली – मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसरासह शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे भामरागडच्या...
Read More
post-image
देश राजकीय

सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज टि्वट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे...
Read More