गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज, 2225 गाड्या येणार कोकणात – eNavakal
News महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज, 2225 गाड्या येणार कोकणात

रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईतून तब्बल 2225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत, तर गणेशोत्सव संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून यावर्षी 1500 गाड्यांचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती रत्नागिरीचे एस.टी.विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांनी दिली आहे.

कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे. कितीही अडचणी आल्या तरी कामानिमित्त परगावी असणारा चाकरमानी गणेशोत्सवाला आपल्या गावी हमखास येतो.. या काळात रेल्वे, बसेस फुल्ल असतात. अनेकांचं आरक्षण कन्फर्म होत नाही. मात्र कितीही अडचणी आल्या तरी या सणाला चाकरमानी येतोच. दरम्यान चाकरमन्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने जय्यत तयारी सुरु केली आहे. दररोजच्या फेऱ्यांव्यतिरिक्त ज्यादा बसेस मुंबई, पुणे, बोरिवली याठिकाणी सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान 2225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून 1414 गाड्या सोडण्यात आल्या होत्या यावर्षी त्यामध्ये वाढ करण्यात आली असून 1500 गाड्यांचं परतीच्या प्रवासासाठी नियोजन करण्यात आलं आहे. याशिवाय रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे स्टेशन ते त्यांचं गाव अशा गाडया सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक मेहत्तर यांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More