गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्यांना वाचविण्यात यश – eNavakal
News महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्यांना वाचविण्यात यश

रत्नागिरी – गणपतीपुळे येथील समुद्रात आज तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये बाराजण बुडाल्याची घटना घडली. बुडणार्‍या बाराही पर्यटकांना येथील स्थानिक तरूणांनी जीवनदान दिले. बुडणार्‍या पर्यटकांमध्ये रत्नागिरी शहरातील नाचणे, बदलापूर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद येथील पर्यटकांचा समावेश आहे.
पर्यटक बुडण्याची पहिली घटना दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी शहरातील चारजण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये मारिया अखिल फकीर (12), सिमरन अखिल फकीर (16), मुबारक शेख (20) आणि रत्नादिप हरिहर शहा (24) या चौघांचा समावेश होता. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हे चारही तरूण पोहण्यासाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात ओढले गेले. समुद्रात बुडू लागल्याने चौघांनीही आरडाओरड सुरू केली. चौघांचा आवाज ऐकुन किनार्‍यावरील जीवरक्षकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे प्राण वाचवले. तर दुसर्‍या घटनेत बदलापूर येथून आलेले पाचजण बुडत असल्याची घटना घडली. यामध्ये प्रणय दत्तात्रय भिसे (18), दिपक तुकाराम हरडकर (30), विनय रविंद्र भिसे (27), भालेश गजानन भिसे (27) आणि विकास गजानन भिसे (24) हे गणपतीपुळेत देवदर्शनासाठी आले होते. हे पाचहीजण समुद्रात आंघोळीसाठी उतरले असताना खोल पाण्यात बुडू लागले. तर तिसर्‍या घटनेत मनिष सुरेश सोनवणे (31) महेश अशोक जाधव (39) आणि विशाल लक्ष्मण शिंदे (21) या तिघांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना
वाचण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ३८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या ३८...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या २ हजार 4३६ रुग्णांची भर...
Read More
post-image
कोरोना देश

रेल्वे भवनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दोन दिवस भवन राहणार बंद

नवी दिल्ली – रेल्वे भवनातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची(coronavirus) बाधा झाल्याने २६ आणि २७ मे दरम्यान रेल्वे भवन बंद राहणार आहे. या काळात रेल्वे भवनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल, परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय...
Read More