गडचिरोलीत माओवाद्यांनी काळा झेंडा फडकवला – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गडचिरोलीत माओवाद्यांनी काळा झेंडा फडकवला

गडचिरोली – देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असतानाच गडचिरोलीमध्ये मात्र माओवाद्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर काळा झेंडा फडकावून काळा स्वातंत्र्य दिन साजरा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गडचिरोलीत खळबळ उडाली असून या परिसरात पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाल्याचे मानले जात आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अरेवाडा गावात हा प्रकार घडला. गडचिरोलीपासून सुमारे 180 किलोमीटरवर हे गाव आहे. आज सकाळी गावातील काही लोक ध्वजारोहण करण्यासाठी पंचायत कार्यालयाकडे गेले असता पंचायत समितीच्या कार्यालयावर काळा झेंडा फडकत असलेला त्यांना दिसला. ग्रामस्थांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More